Uday Samant Dainik Gomantak
महाराष्ट्र

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी घराघरात ओळख: उदय सामंत

दैनिक गोमन्तक

परीक्षा (Exams) रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी राज्यभरातील घराघरात ओळख निर्माण झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून माझ्याकडे एक ही व्यक्ती बघत नाही, असं उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे. ते म्हणताना त्यांचा सूर हा मिश्किल होता. पण विद्यार्थ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढायला हवं आणि यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा, असं ही आवाहन सामंतांनी या वेळी केलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad) खासदार श्रीरंग बारणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामंतांनी ही बाब अधोरेखित केली आहे. कोरोना (Corona) काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे मंत्री सामंत घराघरात पोहोचले आहेत. असे गौरवोद्गार शिवसेना नेते सचिन अहिरांनी काढले आहे.

हाच धागा धरून सामंत म्हणाले पण मला घराघरात नेमकं कशामुळे ओळखू लागले आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यात मी विविध कार्यक्रमांसाठी जातो. तेव्हा मंचावरील खुर्चीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री बसले आहेत म्हणून मला एक ही जण ओळखत नाही. तर परीक्षा रद्द करून, विध्यार्थ्यांना पास करणारे हे मंत्री अशी माझी प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळेच मी विद्यार्थ्यांच्या (Students) आवडीचा मंत्री झालोय,असं म्हणताना सामंतांचा मिश्किल सूर होता, त्यामुळे सभागृहात देखील हसु फुटले.

पण ही भावना चुकीची आहे, त्यामुळे विध्यार्थ्यांना त्या मानसिकतेतून बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा असं ही आवाहन सामंतांनी केलं आहे.

कोरोनाची तिसरी लाट प्रत्येक राज्यात ओसरू लागलेली आहे. सध्या ऑफलाईन वर्ग भरतायेत तसंच आता ऑफलाईन परीक्षा घेण्याचा ही आमचा मानस आहे. यापुढे जाऊन जर पूर्ण क्षमतेने अथवा पन्नास टक्केहून अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांनी त्यावरती तशी सविस्तर चर्चा करायला हवी. ज्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आलेला आहे तिथून तसा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमच्याकडे पाठवावा. त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल आणि प्रस्ताव आलेल्या भागातील परिस्थिती अनुकूल आहे, असं निदर्शनास आल्यास त्या महाविद्यालयांना चालु सकरण्यासाठी तशी मान्यता दिली जाईल.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर (Lata Dinanath Mangeshkar) महाविद्यालय स्थापन करण्याला आजच्या मंत्रिमंडळाने पूर्णतः मान्यता दिली आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर राज्याच्या विविध विद्यापीठातील अठरा अद्यासन केंद्रांना प्रत्येकी तीन कोटींचा निधी देण्याचा निर्णय ही आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

SCROLL FOR NEXT