Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक! मुंबईतील वांद्रे फ्लायओव्हरवर तरुणाने घेतला गळफास; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Crime: मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Mumbai Crime: मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे फ्लायओव्हरवर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये तो तरुण लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. या तरुणाने गळ्यात दोरी बांधून उड्डाणपुलावरुन उडी मारली होती, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या व्हिडीओची दखल घेत अधिकार्‍यांना याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील फ्लायओव्हरवर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे.

आपली जीवनयात्रा संपवणारा हा तरुण मूळचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये (Hospital) नेण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र, मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

तसेच, मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या केल्याचा दावा आता विनोद पाटील यांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मुंबई पोलिस करत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण असतानाचा धारावाशिव जिल्ह्यातील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT