Bombay High Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bombay High Court ला लाभणार सहा नवे न्यायमूर्ती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Bombay High Court News: मुंबई उच्च न्यायालयाला सहा नवे न्यायमूर्ती मिळणार आहेत. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वाधुमल चांदवानी, अभय सोपनराव वाघवसे, रवींद्र मधुसुदन जोशी आणि वृषाली विजय जोशी यांची हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणार असून यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता 61 वरून 67 होणार होणार आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण कमी होऊन केसेस लवकरात लवकर निकाली लागण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे.

सध्या 61 न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयात आहेत. त्यातील 43 स्थायी न्यायाधीश आणि 18 अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ही न्यायाधीशांची संख्या अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर देशातील दुसर्‍या क्रमांकाची आहे. इथे न्यायालयाची मंजूर संख्या 94 आहे. आता या सहा न्यायमूर्तींनी न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर उच्च न्यायालयाचे एकूण संख्याबळ 67 होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून संतोष चपळगावकर आणि मिलिंद साठ्ये या दोन वकिलांच्या नावांची शिफारस केली होती, परंतु केंद्र सरकारने त्यांची नावे अद्याप स्पष्ट केलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? 'अनफॉलो' आणि पोस्ट डिलीट केल्याच्या चर्चेमागचं नेमकं सत्य काय?

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Horoscope: सोमवारी 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ; महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील सर्व अडलेली कामे!

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

SCROLL FOR NEXT