Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: महत्वाची बातमी! कासू-इंदापूरचा टप्पा वगळता पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग होणार सज्ज

Mumbai-Goa highway Update: मुंबई-गोवा महामार्गासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा कासू-इंदापूर हा टप्पा वगळता पावसाळ्यापूर्वी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं आहे. अनेक सरकारे आली आणि गेली पण कोणत्याही सरकारने या महामार्गाचं काम तडीस नेलं नाही. पण याचदरम्यान, मुंबई-गोवा महामार्गासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा कासू-इंदापूर हा टप्पा वगळता पावसाळ्यापूर्वी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या महामार्गाचे काम 12 टप्प्यात पूर्ण होणार आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात येणार असल्याचे उच्चस्तरीय बैठकित ठरले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन टप्प्यात महामार्गाचे काम पूर्ण होणार

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. एनएचआयकडून या महामार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. तर उर्वरित 355.60 किमीचा मार्ग केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून एकूण दहा टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत 12 टप्प्यांचे काम 100 टक्के पूर्ण झाले. मात्र हे चार टप्पे व्यतरिक्त 8 टप्प्यांचे कामे लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कासू ते इंदापूरदरम्यानच्या कामास विलंब

दुसरीकडे, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील परशुराम घाटातील काम हे या संपूर्ण महामर्गातील कठीण असा भाग आहे. सध्या महामार्गाचे काम 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर कशेडीजवळील भागाचेही काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून या दोन्ही भागांचे काम पूर्ण करण्यात येत आहे. मात्र कासू ते इंदापूरदरम्यानच्या कामांना थोडा विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT