Mumbai Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: ऑनलाईन डिलिव्हरी घेताना काळजी घ्या! मुंबईतील एक व्यक्ती महिलांना पाठवायचा अश्लील व्हिडीओ

डिलिव्हरी बॉय वस्तू घरी पोहचविताना महिलांचे नंबर घ्यायचा आणि घाणेरडे काम करायचा.

Pramod Yadav

Mumbai: तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping)) करत असाल तर काळजी घ्या. मुंबईतील मालाडमधून (Malad, Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ई-कॉमर्स कंपनीचा 27 वर्षीय डिलिव्हरी बॉयने अश्लील कृत्य केले आहे.

डिलिव्हरी बॉय वस्तू घरी पोहचविताना महिलांचे नंबर घ्यायचा आणि घाणेरडे काम करायचा. (Mumbai Delivery boy saved numbers of women, sent them porn )

मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) वस्तू घरी पोहचविण्यासाठी जायचा त्यावेळी त्या घरातील महिलांचे नंबर घेऊन सेव्ह करायचा. नंबर सेव्ह केल्यानंतर डिलिव्हरी बॉय त्यांना व्हिडिओ कॉल करायचा. तसेच अश्लील व्हिडीओ पाठवायचा. एवढेच नाही तर डिलिव्हरी बॉय व्हिडिओ कॉल दरम्यान त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवायचा असे, पोलिसांनी म्हटले आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने डिलिव्हरी बॉयविरोधात मालाड पोलिसात तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी त्याच्याकडून पार्सल घेणाऱ्या महिलांचे मोबाईल नंबर सेव्ह करत असे आणि नंतर त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवायचा. असे, तपासादरम्यान समोर आले.

मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एक पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. आरोपीला शुक्रवारी (17 फेब्रुवारी) रात्री पुण्यातून पकडण्यात आले. ज्योतिराम बाबुराव मनसुले असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुणे आणि मुंबईतील 20 ते 25 महिलांना फोन करण्यासह त्यांना व्हिडिओ क्लिपही पाठवल्या आहेत. असे आरोपीने सांगितले. शनिवारी (18 फेब्रुवारी) आरोपीला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT