3 ते 9 सप्टेंबर दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो.  Dainik gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: पुढील 2 आठवड्यात राज्यात असा असेल पावसाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. तेथे सरासरीच्या तुलनेत फक्त 36 टक्के पाऊस पडला आहे.

दैनिक गोमन्तक

Monsoon Update: मागिल आठवड्यात पावसाला (rain) सुरुवात झाली खरी परंतु तो जास्त काळ राहिला नसला तरी त्याने खरीपाला जीवनदान दिले आहे. परंतु पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र, (Maharashtra) मराठवाडामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. तर कोकण (Konkan) आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

पावसामध्ये सतत पडणारा खंड, कमी वेळेत होणारा जास्त पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे चिंता वाढली आहे. आता राहिलेल्या हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा सगळेच करत आहेत. मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षपा कमी पाऊस झाला आहे.

19 ते 25 ऑगस्ट दरम्यान धुळे, नगर, सोलापूर, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील बुलडाणा, अकोला, तर कोकण पट्ट्यातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. तेथे सरासरीच्या तुलनेत फक्त 36 टक्के पाऊस पडला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली या भागांमध्ये पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरमध्ये कोकणात कमी पावसाचा अंदाज

वेधशाळेच्या अंदाजानुसार येणाऱ्या दोन आठड्यात म्हणजेच 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरीपेक्षा अधिक तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

3 ते 9 सप्टेंबर दरम्यान या भागात चांगल्या पावसाचा अंदाज

3 ते 9 सप्टेंबर दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो. या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्याचा दक्षिण भाग येथे पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असेल. असे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, पावसात पडत असलेल्या खंडामुळे तापमानात मात्र मोठी वाढ पहावयास मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT