Monsoon Update: Orange Alert in North Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: उत्तर महाराष्ट्राला ‘ऑरेंज’, मुंबईसह 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट'

त्याचबरोबर औरंगाबादलाही (Aurangabad) असाच इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह 11जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’(Monsoon Update)

दैनिक गोमन्तक

महाराष्टाच्या अनेक ठिकाणी पावसाने (Maharashtra Rain) आता विश्रांती घेतलेली दिसत आहे तर काही थैमान मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सावट अजूनही कायमच आहे.अशातच आता उत्तर महाराष्ट्राला (North Maharashtra) बुधवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Rain Orange Alert) दिला आहे (Monsoon Update). त्याचबरोबर औरंगाबादलाही (Aurangabad) असाच इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह 11जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’दिला गेला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे (Weather Department) मंगळवारी देण्यात आली आहे. (Monsoon Update: Orange Alert in North Maharashtra)

अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने काल हजेरी लावलेली पाहायला मिळाली . मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर, हिस्सार, दिल्ली, हददोई, वाराणसी, देहरी, रांची या दरम्यान निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. ओरिसा आणि बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. हे क्षेत्र दक्षिण ओरिसा, उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या दोन दिवसांत चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची स्थिती आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तर दुसरीकडे खानदेश व मराठवाड्याच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या जोरदार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि औरंगाबाद येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

त्याचबरोबर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी-अधिक स्वरूपात राहील असा अंदाज आहे . गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, तापमानाचा पारा गेली काही दिवस सातत्याने २६ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे आता अशातच या अंदाजाने या चटक्यापासून कुठेतरी दिलासा मिळेल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT