Maharashtra Rain Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

अरबी समुद्रात मोसमी पाऊस दाखल; अनेक भागात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू

Maharashtra Rain Update: मोसमी पाऊस अखेर अरबी समुद्रात दाखल झाल्याने आता राज्यात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

यंदा कडक उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा उन्हाळा त्रासदायक गेला. पण मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने सामान्य नागरिक, लहान मुले, शेतकरी बांधवांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. अंदमान निकोबार, केरळ नंतर आता नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास महाराष्ट्राकडे झाला आहे. मोसमी पाऊस अखेर अरबी समुद्रात दाखल झाल्याने आता राज्यात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे. (Maharashtra Rain Update News)

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही तासांपासून पाऊस पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण यांचा समावेश आहे. या भागात वादळी पाऊस सुरू आहे. फळबागांचे नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागराच्या जोडीला अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने कोकणकिनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT