राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon: राज्यात पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

कोकणात अनेक भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि राज्याच्या उर्वरित भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते. तसेच कोकणात (Konkan) बहुतांश भागांत तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र (Maharashtra) या ठिकाणी तर उर्वरीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of Rain) हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

कमी दाबाचा पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. दोन दिवसांत हा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्नाटकपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत समुद्र सपाटीपासून उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण असल्याने सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यात श्रावण सरीला अनेक भागात सुरुवात झाली आहे. हिमालयाच्या दिशेने असलेला मॉन्सून त्याच्या सर्वसामान्य स्थितीत आल्यानंतर महाराष्ट्रासह मध्य आणि पश्चिम भारतात पावसाला सुरुवात होऊ शकते.

आज राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि राज्याच्या उर्वरित भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ghodemodni: 'बोला पुंडलिक वर दे..'! अभूतपूर्व जल्लोषात सर्वणची घोडेमोडणी साजरी; शेकडो नागरिकांची उपस्थिती

Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT