राज्यात पावसाने केलेल्या कमबॅकमुळे बळीराजासह सर्वजण सुखावले आहेत.
राज्यात पावसाने केलेल्या कमबॅकमुळे बळीराजासह सर्वजण सुखावले आहेत. Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मॉन्सूनचे कमबॅक, कोकणात पुढील 4 दिवस 'रेड अलर्ट'

दैनिक गोमन्तक

मुंबई: राज्यात मॉन्सूनने कमबॅक (Monsoon comeback) केल्याने बळी राजासह सर्वजण सुखावले आहेत. कोकण (Konkan), मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. कोकणात आधी चक्रिवादळाने थैमान घातले, नंतर जुनमध्ये मुसळधार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा कोकणाला पुढील चार दिवस रेड आलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाने केलेल्या कमबॅकमुळे बळीराजासह सर्वजण सुखावले आहेत. राज्याप्रमाणेच देशात देखील मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 13 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसाने हजेरी लावली आहे. यंदा मॉन्सून केरळात जरी थोडा उशीरा आला असला तरी त्याची उत्तरेकडील वाटचाल पुढे वेगाने झाली होती. 19 जूनला संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग तसेच राजस्थानचा काही भाग व्यापला होता. आज मॉन्सूनने बारमेर, अलिगड, आंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात पोहोचला आहे. सर्वसाधारणपणे 8 जुलै पर्यंत मॉन्सून संपूर्ण देश व्यापून टाकतो. मात्र, यंदा परिस्थिती अनुकूल नसल्याने पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबात यंदा मॉन्सूनचे आगमन लांबले आहे.

बंगालच्या उपसागरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण

पण आता बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज दिल्लीसह मॉन्सूनची प्रगती झाली आहे. मॉन्सून सोमवारपर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

कोकणाला रेड तर विदर्भला ऑरेंज आलर्ट, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

दोन ते तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात रेड आलर्ट, तर वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, यांना ऑरेंज आलर्ट दिला आहे. तर रायगड, ठाणे, सातारा, बुलडाणा, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT