Blackmailing Dainik Gomantak
महाराष्ट्र

सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा तिचा विकृत खेळ खल्लास, 50 जणांकडून....

मुंबईत एका मॉडेलने 50 हून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून सेक्स व्हिडिओ बनवला.

Manish Jadhav

मुंबईत एका मॉडेलने 50 हून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून सेक्स व्हिडिओ बनवला. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला लोकांना आपल्या घरी बोलवायची आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवताना व्हिडिओ रेकॉर्ड करायची.

नंतर या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांना ब्लॅकमेल करुन खंडणी वसुल करायची. तिने सुमारे 35 लाख रुपये गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. या देहविक्री टोळीचा नुकताच कर्नाटक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

दरम्यान, पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केल्यावर ही बाब निदर्शनास आली. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, नेहा उर्फ ​​मेहर असे महिलेचे नाव आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर पीडित व्यक्तीची मेहरशी ओळख झाली. यानंतर दोघेही व्हॉट्सअॅपवर बोलू लागले.

दरम्यान, नेहाने सांगितले की, तिचा नवरा दुबईत काम करतो. याचदरम्यान नेहाने पीडित व्यक्तीबरोबर सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसात (Police) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने तिचा फोटो आणि पत्ताही त्याच्यासोबत शेअर केला होता.

3 मार्चचे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास तो मेहेरच्या घरी पोहोचला. त्याने आरोप केला आहे की, जेव्हा तो महिलेसोबत बेडरुममध्ये होता तेव्हा तीन पुरुष आतमध्ये आले. त्यांनी त्याला विचारले की, तो इथे का आला आहे?

यानंतर या सर्वांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर या लोकांनी त्याच्याकडे 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास विवस्त्र करुन भर रस्त्यात धिंड काढली जाईल, अशी धमकी दिली.

त्यानंतर तुला आम्ही मशिदीत नेऊ आणि सुंता करुन मेहरसोबत लग्न लावू. यानंतर त्याने मोबाईल क्रमांकावरुन 21,500 रुपये ट्रान्सफर केल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले.

ओलीस ठेवले होते

त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत गॅंगने त्याला ओलीस ठेवले, असे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले. यानंतर त्याला क्रेडिट कार्डवरुन (Credit Card) अडीच लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. त्यावर त्याने माझे क्रेडिट कार्ड घरी असल्याचे सांगितले.

त्याने आरोपीला माझ्यासोबत घरी चला, तिथे मी पैसे देतो, असे सांगितले. परंतु घरी जाताना तो या गॅंगला चकवा देत तावडीतून निसटला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरु केला.

यादरम्यान, सेक्सटोर्शन रॅकेटने 50 लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती मिळाली. यानंतर ब्लॅकमेल करुन 35 लाखांहून अधिक रक्कम वसूल केली. सध्या या गॅंगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मेहेरचे लोकेशन मुंबईत सापडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT