mns raj thackeray dargah on temple land in pune leader claimes gyanvap aurangzeb tomb Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुण्यात मंदिराच्या जमिनीवर बनल्या दोन दर्गा, मनसेने सुरू केले 'पुण्येश्वर मुक्ती' अभियान

लोकांना राज ठाकरेंच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

नुकतेच मुंबईतील औरंगजेबाच्या कबरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हे स्मारक ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून महाराष्ट्रात आता नवा वाद सुरू होताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरातील दोन दर्गा मंदिराच्या जमिनीवर बांधल्याचा दावा केला आहे.

रविवारी, मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी 'पुण्येश्वर मुक्ती' मोहीम सुरू केली आहे. तसेच लोकांना राज ठाकरेंच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सरकारची झोप उडू लागली आहे. ज्ञानवापीप्रमाणेच पुण्यातील पुण्येश्वर मंदिरासाठीही आम्ही लढत आहोत. खिलजी घराण्याचा सेनापती अलाउद्दीन खिलजी याने पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे पाडली. मंदिरे पाडल्यानंतर त्यावर दर्गा बांधण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

औरंगजेबाच्या थडग्यावर प्रश्न

काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे स्मारकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते उद्ध्वस्त करा, असे म्हटले होते. यानंतर औरंगाबाद येथील मशीद समितीने मकबऱ्याला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एएसआयने स्मारकावर अतिरिक्त रक्षक तैनात करून सुरक्षा वाढवली.

विशेष म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या समाधीवर पोहोचले होते. त्यांच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेने जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही अशा कृत्यांनी महाराष्ट्रात नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT