mumbai majistrat court Dainik Gomantak
महाराष्ट्र

MMC : रस्ताच खराब असेल तर चालकाला अपघातासाठी दोषी ठरवता येणार नाही.

जर रस्ता (Road)खराब असल्यास अपघात हे चालकाच्या चुकीशिवायही घडू शकतात. त्यामुळे चालकाला त्या अपघातासाठी सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबई दंडाधिकारी कोर्टानं(MMC) गेल्या ११ वर्षांपूर्वीच्या एक रिक्षा चालकाला अपघाती प्रकरणावर एका अपघात प्रकरणात निर्दोषमुक्त केलं आहे.

जर रस्ता (Road) खराब असेल तर फक्त चालकाला अपघातासाठी जबाबदार धरता येणार नाही. असा मोठा दिलासा देत मुंबई दंडाधिकारी कोर्टानं एका रिक्षा चालकाला 11 वर्षांपूर्वीच्या (11 Years )एका प्रकरणातून निर्दोषमुक्त केलं आहे. सूरजकुमार जयस्वाल (Suraj Kumar Jaiswal)असे या रिक्षाचालकाचे नाव असून सध्या तो एक पान टपरीचे दुकान चालवतो.

अशी घडली होती घटना :

7 जून 2010 रोजी नसीन बगदादी ही वयस्कर महिला आपली मुलगी आणि दोन नातवंड यांच्यासह गोरेगावहून (Goregaon)मीरा रोडच्या दिशेनं जयस्वाल यांच्या रिक्षानं जात होती. आरे कॉलनीतील तलाव परिसरात रिक्षा चालकांकडून अचानक रिक्षाचा ताबा सुटला आणि ती पलटी झाली. ज्यात नसीन यांच्या बरगड्यांमध्ये आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. तर मुलगीच्या पायालाही मार लागला होता. या घटनेनंतर रिक्षा चालक सूरजकुमार जयस्वाल घाबरून पळून गेला. त्यानंतर तेथील लोकांनी नसीन आणि त्यांच्या कुटुंबाला हॉस्पिटसमध्ये दाखल केलं.

त्यानंतर, नसीन यांनी पोलिसांना(Police) दिलेल्या जबाबीत असे सांगितलं होतं की, जयस्वाल हा रिक्षा अतिशय वेगाने आणि बेफीकरीनं चालवत होता. मॉन्सूनचे दिवस असल्याने रस्ता खूपच खराब झाला होता. मात्र जयस्वाल अतिशय वेगात खड्डे चुकवत 'झिगझॅग' करत, रिक्षा चालवत होता. दुर्दैवानं नसीन यांचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सूरजकुमार जयस्वालला अटक केली.

त्यानंतर, कोर्टाचा निकाल असा होता ?

सन 2012 मध्ये हा खटला बोरीवली दंडाधिकारी कोर्टापुढे सुनावणीसाठी उभा करण्यत आला. आरोपी सूरजकुमार जयस्वालनं त्याच्यावर लावलेले सर्व त्यांनी नाकारले. आणि खराब रस्ता हे अपघातामागचं एकमेव कारण असल्याचे त्याने कोर्टा समोर सांगितलं. नसीन यांची मुलगी स्नेहल यांनीही आपल्या जबानीत तो रस्ता खराब होता हे मान्य केले. तसेच जयस्वाल हा रिक्षा वेगात चालवत होता हे देखील कोर्टाला त्यांनी सांगितलं. परंतु तो नेमका किती वेगात होता? हे मात्र त्यांना सांगता आले नाही. त्यामुळेच जर रस्ता खराब असल्यास अपघात हे चालकाच्या चुकीशिवायही घडू शकतात. त्यामुळे चालकाला त्या अपघातासाठी सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही. असे निरिक्षण नोंदवून न्यायाधीश ए.पी. खानोरकर(Judge A.P. Khanorkar) यांनी आरोपी रिक्षाचालकाला दोषमुक्त केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT