Rohit pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

...आता भाजपा नेते मध्यप्रदेश सरकारला ओबीसीविरोधी म्हणतील का ?

आमदार रोहीत पवार यांचा भाजपावर निशाणा

दैनिक गोमन्तक

ओबीसी आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणाऐवजी दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अधिसुचना जारी कारणे भाग पडणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे.

ओबीसी आरक्षणावरुन निवडणुकीवरुन महाविकास आघाडीसरकारला ओबीसीविरोधी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्र भाजपच्या या भुमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खरपुस समाचार घेतला आहे. पवार यांनी महाराष्ट्र सरकारला ओबीसीविरोधी म्हणणारे भाजपा नेते आज मध्यप्रदेशातील भाजप सरकारलाही ओबीसीविरोधी म्हणतील का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

रोहीत पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात बुधवारी ट्वीट्स केले आहेत. या ट्वीटमधून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाचा भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राप्रमाणेच १५ दिवसात निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारलाही दिले आहेत.या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप सरकारलाही ओबीसीविरोधी म्हणतील का ?” असा सवाल केला आहे.

“जेवढ्या त्वेषानं भाषणं ठोकली…”

“राज्यातील भाजपाच्या सर्व मोठ्या नेत्यांना ओबीसी समाजाविषयी खरंच आत्मीयता असेल तर ओबीसी मेळाव्यात जेवढ्या त्वेषाने भाषणं ठोकली तेवढ्याच त्वेषाने केंद्राकडे इम्पेरिकल डेटाचीही मागणी करावी. अन्यथा ओबीसी आरक्षणाविषयी त्यांची भूमिका ही सिनेमातील बंटी-बबलीप्रमाणे केवळ अभिनयच ठरेल”, असा टोला रोहीत पवार यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT