Minor sexually abused in Kolhapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

किराणा दुकानातील ‘शैतान’; कोल्हापूरात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

खाऊ आणायला घराजवळच्या किराणा दुकानात गेलेल्या लहान मुलीवर त्या दुकानदारानेच लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर : एकविसाव्या शतकात असूनदेखील अजूनही आपल्या देशात आपल्या समाजात महिला सुरक्षित नाहीत. लहान चिमुकली असो, तरुणी असो किंवा अगदी वयोवृद्ध महिला असो यापैकी कुणीच नराध्यमांच्या वासनेपासून वाचू शकल्या नाहीत. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरूंदवाड तालुक्यात घडली आहे. खाऊ आणायला घराजवळच्या दुकानात गेलेल्या लहान मुलीवर त्या दुकानदारानेच लैंगिक अत्याचार ((Sexually Abused) केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरूंदवाड येथील एक लहान मुलगी तिच्या घराजवळील किराणा दुकानात खाऊ आणायला गेली होती. त्यावेळी आजूबाजूला कुणीच नसल्याचे बघून 35 वर्षीय अभिजित सुभाष नाडगोंड याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने घाबरून सर्व घटना तिच्या आईला सांगितली.

त्यानंतर त्या दुकानदाराने भीतीपोटी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो आपले दुकान बंद करून पळायच्या तयारीत असताना त्या मुलीच्या घरच्यांनी आणि संतप्त गवकऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला. अत्यंत लाजिरवाणे कृत्य करून तो नराधम स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. पण गावातील जमावाने त्याला मारहाण करत त्याच्या दुकानातील सर्व साहित्य फेकून देत दुकान उद्ध्वस्त केले.

यावेळी कुरूंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भक्कम पुरावे मिळताच नराधमावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन केले पोलिसांनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT