minor obscene video english tuition teacher it act case filed pune maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य

शिक्षिकेच्या पायाखालची सरकली जमीन

दैनिक गोमन्तक

पुण्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने धक्कादायक कृत्य केले आहे. त्‍याने त्‍याच्‍या शिकवणी शिक्षिकेचे अश्‍लील व्हिडीओ बनवल्‍याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचे वय 16 वर्षे आहे. तो दहावीत शिकतो. गेल्या 5 वर्षांपासून त्याला घरी शिकवण्याची जबाबदारी त्याच्या आई-वडिलांनी एका महिला शिक्षिकेवर दिली होती. महिला शिक्षिका पुण्यातील कोथरूड परिसरात घरी येऊन आरोपी विद्यार्थ्याला शिकवायची. ती आरोपी विद्यार्थ्याला इंग्रजी शिकवायची.

...असा झाला खुलासा

जेव्हा ती त्याला शिकवायला आली. यादरम्यान शिक्षक विद्यार्थ्याच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी बाथरूममध्ये गेली. मग तिला यावेळी साबणाच्या पेटीच्या मागे काहीतरी चमकताना दिसले. तिने पेटी काढली तेव्हा तेथे मोबाइल दिसला, त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते.

महिला शिक्षिकेचे अनेक व्हिडिओ

शिक्षिकेने तो मोबाईल तिच्या घरी नेऊन तपासला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिचे अनेक व्हिडिओ रेकॉर्ड मोबाईलमध्ये सापडले होते. हे सर्व व्हिडिओ (Video) बाथरूममध्ये काढण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये कॉल गर्लचे पॉर्न साइट आणि अश्लील चॅटिंगचे व्हिडिओही आढळून आले. घरातील आई-वडिलांमधील भांडण, वादावादीचे व्हिडिओही मोबाईलमधील एका फोल्डरमध्ये सापडले आहेत.

अल्पवयीन विरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी महिला शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस (police) ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असल्याने या 16 वर्षीय मुलाची बाल गृहात रवानगी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT