Media strangulation by Thackeray government Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: ठाकरे सरकारकडून माध्यमांची मुस्कटदाबी - देवेंद्र फडणवीस

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र विधिमंडळात(Maharashtra Assembly) भाजपच्या(BJP) 12 आमदारांच्या निलंबनाचे पडसाद जोरदार उमटायला सुरवात झाली आहे.दुसऱ्या दिवशीही विधिमंडळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजप विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभासुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विधिमंडळ कामकाज विधिमंडळात चालवत आहेत .

त्यात आता ठाकरे सरकार माध्यमांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काल विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी प्रचंड गदारोळ झालेला पाहायला मिळाला . त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होत . या कारवाईचे पडसाद आज विधानसभेत आणि सभागृहाबाहेर पडसाद उमटायला सुरवात झालीय .

कालच्या या ठरावावर भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केल आहे. त्याचबरोबर भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभाही विरोधकांनी भरवली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला पण यावेळेस प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला .

सरकारने या प्रतिविधानसभेचा विरोध करत विधानसभा अध्यक्षांकडे विरोधकांवर कारवाईची मागणी केली भास्कर जाधव, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुरेश प्रभू यांनी सभागृहात आक्षेप घेतला. आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी कारवाई केली. मार्शलनी स्पीकर, माईक जप्त केले. त्यानंतर फडणवीसांनी संताप व्यक्त करत पत्रकार कक्षात प्रतिविधान सभा सुरू केली.

या प्रतिसभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत या सरकारने विधानसभेत काळा अध्याय लिहिला आहे. खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांचं निलंबन केलं आणि आम्ही शांतपणे प्रति अधिवेशन करत असताना मार्शल पाठवून आमच्यासह पत्रकारांवर दंडुकेशाही केली. हे सरकार माध्यमांचीसुद्धा मुस्कटदाबी करत आहे असा जोरदार हल्ला त्यांनी सरकारवर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT