massive fire at ballarpur paper mill wood depot in maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बल्लारपूर पेपर मिलच्या वुड डेपोला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

दैनिक गोमन्तक

रविवारी संध्याकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-अल्लापल्ली मार्गावर असलेल्या बिल्ट ग्राफिक पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग लागली. मात्र, सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग एवढी भीषण होती की त्यामुळे जवळचा महामार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. आग इतकी भीषण होती की 24 तास उलटूनही आग आटोक्यात आणता आली नाही. या घटनेची माहिती देताना बल्लारपूरचे तहसीलदार म्हणाले की, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डेपोमध्ये 40 हजार टन लाकडाचा साठा

मिळालेल्या माहितीनुसार, हा लाकूड डेपो बांबू आणि लाकडाचा आहे. हे देखील आग वेगाने पसरण्याचे एक कारण आहे. येथे मोठ्या प्रमाणात लाकूड साठवले जाते. पेपर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डेपोमध्ये सुमारे 40,000 टन लाकडाचा साठा होता, जो आगीत नष्ट झाला.

महामार्ग बंद

घटनास्थळाजवळ एका खासगी कंपनीचा पेट्रोल पंप आणि बांबू डेपोही आहे. आग पसरून तिथपर्यंत पोहोचली होती. मात्र, पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा नव्हता आणि तो १० दिवस बंद होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळाजवळ असलेला बल्लापूर-आल्लापल्ली महामार्ग रात्री बंद होता, त्यामुळे रस्त्यावर पाच किलोमीटरपर्यंत जड वाहतूक होते. सोमवारी सकाळी हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT