Varsha Usgaonkar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

वर्षा उसगांवकर यांच्यासह 5 जणांना लाखोंचा गंडा! गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकवून चित्रपट निर्मात्यानं लाटलं; नंबर बदलून झाला पसार

Varsha Usgaonkar Fraud Case: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह इतर पाच जणांची तब्बल 47 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह इतर पाच जणांची तब्बल 47 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी चित्रपट निर्माता आणि बिल्डर अविनाश जाधव याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून जाधवने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी मृणालिनी सुभाष जांभळे, ज्या स्वतः मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत, त्यांची आरोपी अविनाश जाधवशी व्यावसायिक ओळख होती. जाधवने स्वतःची ओळख एक मोठा बिल्डर आणि चित्रपट निर्माता म्हणून करुन दिली होती. त्याने डोंबिवली येथील एका मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम परतावा म्हणून मिळेल आणि मूळ रक्कम एका वर्षात परत केली जाईल, असे आमिष फिर्यादींना दाखवले होते.

जाधवच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), मृणालिनी जांभळे आणि इतर तीन गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली. ही सर्व रक्कम चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे जाधवच्या खात्यात जमा करण्यात आली होती.

फसवणुकीची पद्धत

सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी जाधवने गुंतवणुकीचा परतावा म्हणून 4 लाख 52 हजार रुपये परत केले. मात्र, त्यानंतर त्याने पैसे देणे पूर्णपणे बंद केले. जेव्हा गुंतवणूकदारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा त्याने आपले मोबाईल नंबर आणि राहण्याचे पत्ते बदलून टाळटाळ सुरु केली. फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी त्याला डोंबिवली येथे गाठले. मात्र, तिथे त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि उलट "मी तुमचे पैसे परत करणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा," अशी धमकी देत गुंतवणूकदारांना हुसकावून लावले.

पोलिसांची कारवाई

अखेर या फसवणुकीप्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी अविनाश जाधवविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश शेजुळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या फसवणुकीत चित्रपटसृष्टीतील आणखी काही व्यक्तींचे पैसे अडकले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT