Rape case  Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक : नागपुरात अल्पवयीन मुलीचं 2 वर्षे लैंगिक शोषण

जरीपटका पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपुर्वीच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने आपल्या सर्वेक्षण अहवाल-5 नुसार स्पष्ट केलं आहे कि, भारतात महिलांवर होणाऱ्या शाररिक हिंसाचारात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक बाब घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. नागपूर येथील एका 27 वर्षीय तरुणानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. (27-year-old man sexually abused minor girl in Nagpur )

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अमितेश आशिष श्रीवास याने मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. दरम्यान १० मे रोजी आरोपीनं पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. यानंतर पीडित मुलीनं संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

अमितेश आशिष श्रीवास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीच्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती आठवीत असतानाच आरोपी अमितेश यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. ‘आपण लग्न करू, सुखाचा संसार असेल, मुंबईत घर घेऊ’ अशी पूर्ण न होणारी स्वप्न आरोपीनं तिला दाखवली होती. यामुळे ती आरोपीच्या जाळ्यात अलगद अडकली होती.

संशयित आरोपी हा पीडितेशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. पण मुलीने अमितेशकडे दुर्लक्ष सुरु केल्यावर आरोपीने चिडून तिला बदनामीची धमकी देत होता.यानंतर घाबरलेल्या मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. घटनेची माहिती मिळताच आईसह मुलीने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT