Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: वडीलांच्या आजारपणाला मुलगा कंटाळला, वडील झोपेत असताना डाव साधला

वडीलांच्या आजारपणाला कंटाळलेल्या 21 वर्षीय मुलाने त्यांचा खून केला आहे.

Pramod Yadav

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडीलांच्या आजारपणाला कंटाळलेल्या 21 वर्षीय मुलाने त्यांचा खून केला आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. वडील झोपेत असताना त्याने त्यांच्या डोक्यात दगड घातला व नंतर चाकूने गळा चिरला. बुधवारी डोंबिवली येथे ही घटना घडली.

तेजस शिंदे (वय 21) असे या अटक मुलाचे नाव आहे. मुलानेच पोलिसाने फोन करून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. श्यामसुंदर (68) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. व्यक्तीचा मृतदेह घरात सापडला असून, सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.

मागील काही दिवसांपासून तेजसचे वडील आजारी होते. त्याचे आणि वडीलांचे दररोज खटके उडायचे व वाद व्हायचा असे पोलिस तपासात समोर आले आहे.

बुधवारी ही घटना होण्यापूर्वी दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी तेजसची आई घराबाहेर पडली. त्यानंतर श्यामसुंदर झोपी गेले, त्याचवेळी तेजसने आपल्या वडीलांचा खून केला. असे पोलिसांनी सांगितले.

तेजस पदवीचे शिक्षण घेत होता आणि त्याच्या वडीलांना पंधरा हजार रूपये निवृत्तीवेतन होते. यावर त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालत होता. वडील मुंबई पालिकेत सुरक्षा रक्षम म्हणून काम करत होते. तेजसला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT