Arrested Dainik Gomantak
महाराष्ट्र

दारूच्या नशेत डॉक्टरांना केली मारहाण; गेला 6 महिन्यांसाठी गजाआड

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. महेश मधुकर पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर सदर घटना 8 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालयात घडली होती. (man beat doctor under influence alcohol and was sentenced to six months in prison)

आरोपी महेश मुधकर पाटील यांनी मद्यप्राशन करून, रुग्णालयातील करोना विलगीकरण कक्षात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर विक्रमजित पाडोळे व त्यांच्या साथीदारांना धक्काबुक्की, शिवीगाळी तसेच मारहाण केली होती. जिल्हाधिकारी रायगड यांनी लागू आपत्ती व्यवस्थापन कायद्या आंतर्गत केलेल्या करोना विषयक आदेशांचे उल्लघन करत करोना विलगीकरण कक्षात बेकायदेशीर रित्या प्रवेश केला होता.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम 353,504,269,270,188 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणी पोलीसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल देखील करण्यात आलं होत. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश 1 तसेच अतिरीक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात झाली होती. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून अँड. प्रमोद हजारे यांनी काम पाहिले आहे. सुनावणी दरम्यान एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आली होती. यात फिर्यादी डॉ. विक्रमजीत पाडोळे, साक्षीदार डॉ. साहील मकानदार, तपासिक अंमलदार एस एस शेंबडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या आहेत.

न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला, आणि आरोपीला भादवी कलम 353 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 85 अन्वये आरोपीला दोषी ठरविले आहे. दोन्ही कलमांअंतर्गत सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT