Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गसाठी 'महायज्ञ'; कोकणवासीयांनी लावली हजेरी

Mumbai Goa Highway: कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोकणात जाणारा एकमेव महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग...

मात्र आता हाच महामार्ग कोकणवासीयांसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यातच पावसाळा सुरु होताच हा महामार्ग खड्डे आणि चिखलानं भरुन गेलाय. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणं जिकरीचं बनलं आहे.

याचदरम्यान, या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकणवासीयांनी शेवटचा पर्याय अवलंबला आहे. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी महायज्ञ करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. या महामार्गाला आलेली अवकळा दूर करण्यासाठी जन आक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे महायज्ञ करण्यात आला.

महामार्गाचे दुष्ट चक्र लवकरात लवकर संपावे आणि त्यासाठी प्रशासनाला सदबुद्धी यावी, चांगला ठेकेदार मिळावा यासाठी आता देवाकडे साकडे घालण्यात आले आहे. माणगावच्या बस स्थानक परिसरात हा यज्ञ करण्यात आला. या यज्ञासाठी शेकडो कोकणवासी सहभागी झाले होते.

दुसरीकडे, पावसाळ्यातही मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्याचं दुष्टचक्र कायम आहे. महामार्गावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातो.

दरम्यान, महामार्गाचे अर्धवट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधी आदेश दिलेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महामार्गावरील अर्धवट पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील तब्बल 12 पुलांची कामे ठप्प आहेत. अंजणारी, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, वाकडे पुलांची कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश गडकरींनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT