Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवस संपावर, वाचा संपाचे कारण काय?

खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवस संप पुकारला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात निवासी डॉक्टरांचा संप मिटल्यानंतर काल मध्यरात्रीपासून राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शेतकरी व सामन्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. 4,5 व 6 जानेवारी 2023 असा तीन दिवस हा संप असणार आहे.

गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे.

वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत.

काल मध्यरात्री पासून 72 तासांचा हा संप पुकारला असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे. दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT