Ganpatrao Deshmukh Dainik Gomantak
महाराष्ट्र

Breaking: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

दैनिक गोमन्तक

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाले आहे व्हायच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सर्वात मोठे राजकारणी होते. ते सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून अनेक दशके निवडून आले होते.

(Maharashtra's longest serving MLA Ganpatrao Deshmukh passes away)

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणून गणपतराव देशमुख ओळखले जायचे .वय इतके होते. गणपतराव देशमुख हे तब्बल बारा वेळेस विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते .सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ बाराव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ६० वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.ते २ वेळेस राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत.

देशमुख यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यानी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT