Maharashtra Weather Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: येत्या चार दिवसांत उष्णतेचा पारा वाढणार

राज्यात पुढील चार दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसनं वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाचा दर्शविला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रामध्ये येत्या चार दिवसांत उष्णतेचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. सूर्याचे यूव्ही इंडेक्समध्ये वाढ झाल्याने सूर्याच्या अतिनील किरणाची तीव्रता वाढली आहे असे हवामान विभागाच्या (India Meteorological Department) वतीनं सांगण्यात आलं आहे. यामुळे मार्च महिन्यात दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटा (Heat Wave) वाहताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात आजपासून ते 31 मार्चपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. यामुळे मराठावाडा, विदर्भ अनेक भागात पारा 43 अंशाच्या पार गेला आहे. यामुळे दुपारी घराबाहेर निघताना काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) तापमानाचा पारा वाढला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमान 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. 31 मार्चला राज्यात हवामान जैसे थे कायम राहणार असून चंद्रपूरात तापमान तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'काणकोणची जनता तिसऱ्या जिल्ह्यात सहभागी होणार नाही'! गोवा फॉरवर्डच्या नाईकांचा दावा; भाजप रवी नाईक यांचा वारसा संपवत असल्याचा आरोप

Kushavati District Goa: 'कामे झाली तरच उपयोग'! नव्या ‘कुशावती’ जिल्ह्याकडून लोकांच्या अपेक्षा; काय आहेत प्रतिक्रिया, वाचा..

Goa Tourism: ..यावेळी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट! व्यावसायिकांचा दावा; खंडित विमानसेवा, आगप्रकरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

Goa Tourism: ‘कम टू गोवा’ एवढ्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत! Social Media वरील बदनामी थांबवण्याची गरज

FDA: फक्त दंडच नाही, दुकानेही बंद! 2026 साठी ‘एफडीए’ सज्ज; अन्नपदार्थांची होणार कसून तपासणी

SCROLL FOR NEXT