Maharashtra Rain: Heavy rain in Maharashtra 13 peoples died cause of Floods and Lightning Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार, 17 जिल्ह्यांना अलर्ट, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) मराठवाडा भागात, मुसळधार पाऊस , पूर आणि वीज पडून 13 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) मराठवाडा भागात, मुसळधार पाऊस (Heavy Rain), पूर आणि (Floods) वीज पडून 13 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एनडीआरएफच्या (NDRF) टीमने 560 हून अधिक लोकांना वाचवले आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली असून ते म्हणाले की रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे दोनशेहून अधिक जनावरे वाहून गेली आणि अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे.(Maharashtra Rain: Heavy rain in Maharashtra 13 peoples died cause of Floods and Lightning)

तर दुसरीकडे मुंबईतही मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टीच्या कोकण भागात मोठी 'अतिवृष्टी' होण्याची शक्यता आहे. मराठवाडा हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे जिथे पावसाने प्रचंड नाश केला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांना या पावसाचा प्रचंड फटका बसला आहे.

या सतत कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील एका ओढ्यावर रस्ता ओलांडताना राज्य वाहतुक महामंडळाची बस वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण बेपत्ता झाले आहेत . ही घटना उमरखेड तहसीलमधील दहागाव पुलावर सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.

शासनाच्या एका अधिकृत निवेदनात गेल्या 48 तासांमध्ये, सहा जिल्ह्यांतून एकूण 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे, विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अजून याचा परिणाम संपला नसून पुढील 48 तास राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

5 जिल्ह्यांसाठी रेड तर 12 जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट

त्याचबरोबर हवामान विभागाने महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमध्ये पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदुरबार यासारख्या इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT