Maharashtra Politics| Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार? निवडणूक आयोगाच्या घोषणेची प्रतीक्षा

Eknath Shinde Latest News: शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पुन्हा तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पुन्हा तीन चिन्हांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून 'तळपता सूर्य' चिन्हाला परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन गटात मशाल विरुद्ध तळपता सूर्य असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सोमवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव दिले. पण शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज सकाळपर्यंत नवीन चिन्हाचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे (Shinde) गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले होते. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हा पर्याय पाठवला होता. त्यापैकी निवडणूक आयोगाने 'तळपता सूर्य' हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याची अधिक शक्यता आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने 'मशाल' निवडणूक चिन्ह दिले आहे. ठाकरे गटाने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा पर्याय दिला होता. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हाचा सोशल मीडियावर (Social Media) जोरदार प्रचार करण्यात आला. शिवसैनिकांकडून जल्लोषात या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT