Maharashtra Police Bharti 2021 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Police Bharti 2021: पोलीस दलातील 5200 पदे तातडीने भरणार

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल महत्वाची घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. मात्र, या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 31 डिसेंबर पूर्वी कोणत्याही परिस्थितीत 5 हजार 200 पदांची भरती करणार असे त्यांनी सांगतिले.

त्याचबरोबर इतर 7 हजार रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिलीप वळसे यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करत असलेल्या तरूणांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. (Maharashtra Police Bharti 2021 5200 posts in police force to be filled immediately)

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील औरंगाबाद दौऱ्यावर होते. औरंगाबाद येथिल पत्रकारांशी संवाद साधतांना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यावेळी औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल. तसेच इतर उर्वरित 7 हजार पदांची भरतीबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काही गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतलेले आहेत. आता उर्वरित गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT