Nashik Car Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nashik Car Accident: नाशिक हादरलं! आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

Nashik Dindori Car Accident: दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर भागात 3 एप्रिलच्या रात्री एक मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली.

Manish Jadhav

Nashik Dindori Car Accident: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर भागात 3 एप्रिलच्या रात्री एक मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 6 निष्पाप बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर (ता. दिंडोरी) येथील दरगुडे कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री 10 च्या सुमारास घरी परतत असताना, शिवाजी नगर परिसरात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार वेगात असल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या 'आशू राजे' यांच्या विहिरीत जाऊन कोसळली.

मध्यरात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन

अपघाताची (Accident) माहिती मिळताच दिंडोरी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या, मात्र प्रशासनाने तातडीने 2 हायड्रा क्रेन आणि अनुभवी पोहणाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले. कारमधील सर्वांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतकांची ओळख (सर्व रहिवासी: इंदोर, ता. दिंडोरी)

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत:

  • सुनील दत्तू दरगुडे (32)

  • रेश्मा सुनील दरगुडे (27)

  • आशा अनिल दरगुडे (32)

  • खुशी उर्फ सृष्टी अनिल दरगुडे (14)

  • माधुरी अनिल दरगुडे (13)

  • श्रेयस अनिल दरगुडे (11)

  • श्रावणी अनिल दरगुडे (11)

  • समृद्धी राजेंद्र दरगुडे (7)

  • राखी उर्फ गुणवंती सुनील दरगुडे

पोलिस तपास सुरु

प्राथमिक तपासानुसार, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिंडोरी पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण, या दृष्टीने तपास सुरु केला आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांच्या मृत्यूने दिंडोरी परिसरातील इंदोर गावावर दुःखा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT