Subhash Desai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Subhash Desai: राष्ट्रीय महत्त्वाच्या धोरणांवर केंद्र राज्यांशी सल्लामसलत करत नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा आरोप

Subhash Desai: राष्ट्रीय महत्त्वाची धोरणे तयार करताना केंद्र राज्य सरकारांशी सल्लामसलत करत नाही, असे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय महत्त्वाची धोरणे तयार करताना केंद्र सरकार राज्य सरकारांशी सल्लामसलत करत नाही, असे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटले आहे. भाजप आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील सतत घर्षण आणि राजकीय रणधुमाळी याचा देशावर विपरित परिणाम झाला आहे, असेही ते म्हणाले. भारत सरकारने राष्ट्रीय महत्त्वाच्या नवीन धोरणांची आखणी करतांना राज्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यांचे म्हणणे ऐकायला हवे. त्याचीच सध्या कमतरता आहे. दोघांमध्ये जो संवाद हवा होता तो होत नाही. तुम्ही आमचे मत घेतल्यास आम्ही तुमची दिशाभूल करणार नाही. (maharashtra minister subhash desai centre not consulting states on policies of national significance)

आपण आपल्या राज्याच्या हिताचे रक्षण करू शकतो. महत्वाच्या विचारांची ही देवाणघेवाण होत नाही, असे देसाई यांनी येथील एक्सप्रेस टाऊनहॉलमध्ये सांगितले. देसाई पुढे म्हणाले की, देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) महत्त्व असूनही, 2019 मध्ये महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही.

बुलेट ट्रेनसारख्या (Bullet Train) महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करताना केंद्र सरकारने राज्यांचे मत विचारात घेत नसल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करताना, तुम्हाला सर्व भागधारकांशी संपर्क साधण्याची गरज आहे, देसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT