Maharashtra-Karnatak Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra-Karnataka: महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला

Maharashtra-Karnataka : कन्नड रक्षण वेदिकेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी बेळगावजवळील हिरेबागवाडीच्या टोलनाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली आहे

दैनिक गोमन्तक

Maharashtra-Karnataka : गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्याचे दिसुन येत आहे . महाराष्ट्रातील सीमेशेजारील काही गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी उदय सामंत यांनी सांगली जिल्ह्यातील जतला काल भेट दिली होती. महाराष्ट्रातील काही नेते या वादावर मार्ग काढण्यासाठी कर्नाटकला जाणार होते. मात्र आज कन्नड रक्षण वेदिकेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी बेळगावजवळील हिरेबागवाडीच्या टोलनाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली आहे .

यामध्ये सहापेक्षा जास्त ट्रकचा समावेश आहे . त्यामुळे आता हा सीमावाद चिघळल्याचे दिसुन येत आहे . दरम्यान, दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.नारायण गौडा यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर केंद्राने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी काही मंत्र्यानी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे . उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हल्ला करणाऱ्यांवर कर्नाटक शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मध्यप्रदेश, गुजरात,कर्नाटक (Karnataka ), तेलंगणा या राज्यांच्या सीमाशेजारील गावे इतर राज्यात जाण्यासाठी काही दिवसांपासुन मागणी करत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) आमच्या मुलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. आमच्या गावाचे रस्ते व्यवस्थित नाहीत . पाण्याची सुविधा नाही.रोजगाराच्या संधी नाहीत . म्हणून आम्हाला शेजारील राज्यांमध्ये जायचे आहे अशी मागणी काही गावांनी केली होती. कर्नाटकपासून सुरु झालेला वाद इतर ठिकाणीही पोहोचलेला दिसून येतात. आज कर्नाटकमध्ये ट्रकवर झालेल्या हल्लयानंतर हा वाद आणखी चिघळणार की या वादावर तोडगा निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT