People wearing mask  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होणार?

राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रात परत एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय देखील सतर्क झाले असून केंद्राकडून पाच राज्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. (Maharashtra government may make mask compulsory again)

महाराष्ट्राची परिस्थिती किती बिकट?
राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 झाली आहे. दरम्यान, तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्णांणी जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना (Coronavirus) बळींची संख्या ही 1.47,830 इतकी झाली आहे. सोमवारी (18 एप्रिल) रोजी राज्यात 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आते होते. तर 16 एप्रिलला 98 आणि 17 एप्रिलला127 नव्या रुग्णांचे निदान झाले होते. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 108 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते.

दिल्लीवर कोरोनाचे सावट
दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 8 टक्क्यांवर गेल्याने लोक चिंता व्यक्त करत आहेत. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत, तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 28 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णवाढ तिप्पट प्रमाणात होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद दिल्लीत मंगळवारी करण्यात आलेली नाही. असे दिल्लीतील (Delhi) आरोग्य प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT