Transgender Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: शिंदे सरकारचा ट्रान्सजेंडर लोकांसाठी मोठा निर्णय, राशन कार्ड अर्जावर मिळणार विशेष सवलत

ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यावर सूट देण्याचा प्रस्ताव जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने थर्ड जेंडर व्यक्तींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने आता नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना तृतीय लिंग व्यक्तींना निवासी पुरावा आणि ओळख पुराव्यासाठी सूट देण्याचा प्रस्ताव जारी केला आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता त्यांची नावे राज्य एड्स नियंत्रण समितीकडे नोंदणीकृत असल्यास किंवा त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास, ज्यामध्ये ते तृतीय लिंग व्यक्ती म्हणून ओळखले जातात, त्यांच्या अर्जाचा विचार केला जाईल.

महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकनाथ शिंदे गटाचे युतीचे सरकार आहे. दुसरीकडे, बुधवारी केंद्र सरकारने गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिन्यांनी म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत वाढवला आहे. त्यासाठी 44,700 कोटी रुपये खर्च येणार आहे. गरिबांना महागाईपासून काहीसा दिलासा देण्याबरोबरच गुजरात (Gujrat) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की ही योजना शुक्रवारी संपत आहे. तो ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 80 कोटी गरिबांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दिला जातो. कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रतिबंधासाठी देशव्यापी 'लॉकडाऊन'मुळे (Lockdown) बाधित गरीबांना दिलासा देण्यासाठी एप्रिल 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT