Maharashtra farmers in trouble dew to heavy rain  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शेतकऱ्यांवर 'अवकाळी' च संकट, कांदा अवघा 1 रुपया किलो

महाराष्ट्रातील पंढरपूर बाजार समितीमध्ये कांदा एक रुपया किलो दराने खरेदी केला जात आहे. अशा स्थितीत कांदा विकण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी कांदा तसाच पडून ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या 4 दिवसांपासून राज्यात बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. आता यामुळे शेतकऱ्यांवर (Farmers) मोठे संकट ओढवताना दिसत आहे. या पावसाने कांद्याचे (Onion Price) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि आता बाजारात या कांद्याला भाव नाही. महाराष्ट्रातील पंढरपूर बाजार समितीमध्ये कांदा एक रुपया किलो दराने खरेदी केला जात आहे. अशा स्थितीत कांदा विकण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी कांदा तसाच पडून ठेवला आहे. महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची ही स्थिती असेल, तर उर्वरित उत्पादनांची काय अवस्था असेल, हे समजू शकते.(Maharashtra farmers in trouble dew to heavy rain)

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर बाजार समितीत कांद्याचा भाव 20 ते 25 रुपये किलोने सुरू होता. मात्र काही शेतकऱ्यांनी नंतर जास्त भाव मिळण्याच्या लालसेपोटी कांद्याची साठवणूक केली होती. मात्र अवकाळी पावसाने सर्व कांदे खराब केले. जे शेतकरी 20 ते 25 रुपये किलोने कांदा विकायला तयार नव्हते, त्यांना आता एक रुपये किलोने कांदा विकावा लागत असल्याची स्थिती आहे.

कांद्याचे भाव कधी वाढतील आणि कधी घसरतील याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवण्यासारखा आहे की पाऊस पडेल की नाही? असेल तर कधी होणार? सोलापूर बाजार समितीत एका शेतकऱ्याने 1123 किलो कांदा विकला. त्याबदल्यात त्याला 1665 रुपये मिळाले. मजुरी, वाहतूक आदी खर्च करून 13 रुपये हातात आले. त्याची ही कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उन्हाळ्यात कांद्याला मोठी मागणी होती. त्यानंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास अवधी शिल्लक होता. तेव्हा कांद्याला 20 ते 30 रुपये किलो भाव मिळत होता. मात्र आता अचानक आलेल्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सध्या या भिजलेल्या कांद्याला योग्य दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने, पुढे जाऊन शहरी मध्यम व गरीब वर्गातील लोकांवर महागाईचा बोजा वाढणार आहे.खराब पिकामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली तर बाजारात कांद्याचे भाव लगेचच वाढतात. एकीकडे बाजारातील अनियमितता आणि दुसरीकडे निसर्गाचा कहर, या दोन्हीच्या परिणामामुळे खेड्यापाड्यात शेतकरी हैराण झाला आहे, तर शहरांमध्ये गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय त्रस्त आहेत. दरम्यान, कांद्यालाही एमएसपीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT