Police arrest two accused in live-in partner murder case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: लिव्ह-इन पार्टनरचा गळा चिरला, मृतदेह 18 तास घरात ठेवला अन् नंतर घाटात फेकून दिला, गर्लफ्रेंडसह दोघांना बेड्या; 15 वर्षांच्या नात्याचा थरारक शेवट!

Nashik Live In Partner Murder Case: महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका महिला लिव्ह-इन पार्टनरने अत्यंत निर्घृणरित्या आपल्याच प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Nashik Live In Partner Murder Case: महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका महिला लिव्ह-इन पार्टनरने अत्यंत निर्घृणरित्या आपल्याच प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह तब्बल 18 तास घरातच लपवून ठेवण्यात आला आणि त्यानंतर मध्यरात्री कारमधून नेऊन कसारा घाटात फेकून देण्यात आला.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या हत्येचा छडा लावत कसारा घाटातून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली असून नाशिक (Nashik) गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत गोरखनाथ सातपुते (वय 40, रा. स्वराजनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वसंत सातपुते हे संशयित हसीना शेख नावाच्या महिलेसोबत गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वसंत यांना दारु आणि जुगाराचे गंभीर व्यसन होते, ज्यावरुन दोघांमध्ये सतत भांडणे होत असत. या सततच्या त्रासाला कंटाळून हसीना शेख हिने आपल्या साहिल शाह आणि मोईन शाह या दोन मित्रांच्या मदतीने वसंतच्या हत्येचा कट रचला.

कटाची अंमलबजावणी करत संशयितांनी वसंत यांचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केला. हत्येनंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि संधी मिळताच मध्यरात्री कारच्या डिकीत टाकून कसारा घाटातील दरीत फेकून दिला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने सूत्रे हलवत तांत्रिक तपासाच्या आधारे कसारा घाटातील दरीतून मृतदेह बाहेर काढला आणि हसीना शेख, साहिल शाह आणि मोईन शाह या तिघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हत्येमागे दारु आणि जुगाराचे व्यसन हेच मुख्य कारण असल्याचे समोर येत असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT