Eknath Shine | Dr. Pramod Sawant | Devendra Fadanvis  Dainik Gokmantak
महाराष्ट्र

Eknath Shinde: गोवा-महाराष्ट्र हे भाऊ-भाऊ; म्हादईचा लढा एकत्रित लढणार; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

तिलारी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली शिंदे-फडणवीस यांची भेट

Akshay Nirmale

CM Eknath Shinde on Mahadayi Water Dispute: गोवा आणि महाराष्ट्र हे भाऊ-भाऊ आहेत. म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न आहे आणि हा लढा महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्रातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.

सुमारे एका दशकाच्या कालखंडानंतर या नियंत्रण मंडळाची बैठक झाली आहे.

शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्राचे नाते भावांसारखे आहे. कर्नाटक विरोधात म्हादईच्या पाण्यासाठीचा लढा गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित मिळून लढतील.

दरम्यान, तिलारी धरण महाराष्ट्रात आहे. तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो. पेडणे, डिचोली आणि बार्देश तालुक्यातील काही भागात हा पाणीपुरवठा केला जातो.

दरम्यान, गेल्या काही काळात म्हादई प्रकल्पाबाबत नवीन डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कर्नाटकने आक्रमकपणे हालचाली सुरू केल्या आहेत. तर गोव्यानेही केंद्रीय नेत्यांची भेट घेत आपली बाजू मांडली आहे.

त्यातूनच केंद्र सरकारने म्हादई प्रवाह या प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्याचे कार्यालयदेखील पणजीमध्ये होणार आहे. म्हादई हा गोव्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहेच पण गोव्याच्या एकूण पर्यावरणावर प्रभाव टाकणारा मुद्दा आहे. त्यामुळे म्हादई बचावासाठीची चळवळही गोव्यात उभी राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT