Maharashtra Budget 2023: Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2023: 'महाराष्ट्राचे महाबजेट', नागपूर - गोवा महामार्गासाठी कशी असेल तरतूद?

Puja Bonkile

Nagpur-Goa Highway: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आज ते पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले असुन नागपुर-गोवा महामार्गासाठी काय खास असणार आहे याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळानं गोवा- नागपूर या 760 किलोमीटर लांबीचा 'ग्रीन फिल्ड सुपरफास्ट' महामार्गाच्या डीपीआरसाठी निविदा मागवल्या होत्या. या महामार्गाचे नाव 'महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेसवे' ठेवण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गासाठी 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे नागपूर–गोवा अंतर फक्त आठ तासांत पार करता येणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या अतंर्गत नागपूर – गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार आहे तर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे. वर्धा येथून हा मार्ग समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरला जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. एकूणच हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून जाणार आहे.

याकडे असेल सर्वांचे लक्ष

शिंदे-फडणवीस सरकार कृषी पायाभूत सुविधा, कापसाला भाव, नाफेड केंद्र सुरू करणे, वीज, ऊस कारखाने, शेत रस्ते, पीकविमा, कर्ज, अनुदान, बियाणे याला किती प्राधान्य देते याकडे बळीराजाचे लक्ष असेल.

दरम्यान, या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत.  राज्यातील आगामी निवडणुका पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या शहरांसाठी जास्तीची आर्थिक तरतूद करण्याला सरकार प्राधान्य देऊ शकतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT