video Dainik Gomantam
महाराष्ट्र

Video: चोराने हिसकावली आजीची सोनसाखळी; चिमुकल्या नातीने घडवली चांगलीच अद्दल

पुण्यात आजीची चेन हिसकावणाऱ्या सोनसाखळी चोरट्याला नातीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

Pune Chain Snatcher: महाराष्ट्रातील पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हत्या, दरोडा, बलात्कार, चोरी अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. अलिकडेच सोनसाखळी चोरांनी देखील शहरात धुमाकूळ घातला आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यातच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात दुचाकीवरुन आलेल्या भामट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

पण तिच्यासोबत असलेल्या 10 वर्षाच्या नातीने चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेतील आजीच्या नातीच्या धाडसाचे कौतूक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत रस्त्यावर मुलीच्या घरी जात होत्या.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या सोन साखळी चोरट्याने आजीच्या गळ्यातील चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासबोत असलेल्या 10 वर्षाच्या नातीने चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT