load shedding Dainik Gomantak
महाराष्ट्र

उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात विजेच्या मागणीत वाढ

कोळसाटंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याने राज्यावर भारनियमनाचे (Load Shedding) संकट आले आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात उष्णतेची लाट आल्याने विजेच्या मागणीत (Electricity Demand) वाढ झाली आहे. त्यातच कोळसाटंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याने राज्यावर भारनियमनाचे (Load Shedding) संकट आले आहे. मागणीपेक्षा वीजपुरवठा कमी असल्याने मंगळवारी म्हणजे 12 तारखेला राज्यात सुमारे एक हजार मेगावॉट विजेचे भारनियमन करण्यात आले होते अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

गेल्या पंधरवड्यापासून महावितरणकडे विजेची मागणी तब्बल 24 हजार 500 ते 24 हजार 800 मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुऱ्या वीजनिर्मितीमुळे सुमारे अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेची टंचाई जाणवत आहे.

त्यासाठी गरजेनुसार वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तात्पुरते भारनियमन करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे. राज्यात होणारी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी असलेल्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन सुरू करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT