Shack Business  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shacks in Konkan: पर्यटनात महाराष्ट्र देतोय गोव्याला फाईट; आता कोकणातील बीचवर उभारणार शॅक्स

8 किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट; मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी

Akshay Nirmale

Shacks on Konkan Beaches: गोव्यातील बीचवर पर्यटकांसाठी बांधण्यात येणारे शॅक्स आता आगामी काळात कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार आहेत.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील 8 समुद्रकिनाऱ्यांवर हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.

महाराष्ट्रातील बीचवर पर्यटनास चालना देण्यासाठी शॅक उभारण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील 8 किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.

रत्नागिरीतील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, कुणकेश्वर, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. इतर किनाऱ्यांवरही टप्प्याने याची कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, शॅक्स उभारण्यासाठी काही नियमही केले आहेत.

  • एका किनाऱ्यावर जास्तीत जास्त 10 शॅक्स उभारता येतील

  • यातील 80 टक्के रोजगार स्थानिकांना द्यावे लागतील

  • शॅक्सचे वाटप तीन वर्षांसाठी असेल

  • शॅकसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार शुल्क असेल

  • सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच शॅक सुरू ठेवता येतील

  • प्रत्येक शॅकमध्ये सीसीटीव्ही ठेवावा लागेल

  • संगीताचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT