Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aryan Khan Case: ...तर राज्याच्या SIT मार्फत कारवाई करु, मलिक यांचे पुन्हा गंभीर आरोप

शाहरुख खानसह (Shah Rukh Khan) अनेकांना यात घाबरविण्यात येत असून, त्याच्याकडून पैसे मागण्यात येत आहे. त्यामुळे यात केंद्र सरकार कारवाई करणार नसेल, तर राज्याची SIT कारवाई करेल त्यामुळे तुम्ही घाबरु नका पुढे या आणि सांगा. चांडाळ चौकटीने NCB चे नाव बदनाम केले आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: एक मोठा अधिकारी सांगू शकत नव्हता 8 की 10 लोक आहेत. यात 11 जण होते मग 3 लोकांना का सोडले? असा सवाल उपस्थित करत नवाब मलिक म्हणाले, मोहित कम्बोज हा अपहरण केले ते समीर वानखडेचे साथिदार आहेत. आर्यन खान (Aryan Khan) स्वत: क्रुझ पार्टीत गेलाच नव्हता त्याला मोहित कम्बोजने (Mohit Kamboj) अपहरण केले होते आणि खंडणी मागण्यात आली. कम्बोज हे 1100 कोटींच्या बँक घोटाळ्याचे आरोपी आहेत. यात आर्यनला गोवण्यात आले आहे, 25 कोटी रुपये मागितले होते. परंतु 18 कोटीची डिल झाली. त्यानंतर आर्यनला मोहित कम्बोज याच्या भाच्याने क्रुझवर नेले. आर्यनकडे क्रुझचे तिकिट देखील नव्हते. 22 तारखेला नेते मनोज संसारे आहेत. त्यांचा मला फोन आला ते म्हणाले, के.पी. गोसावी आणि त्यांचे साथीदार सरेंडर करत आहेत. असे अनेक खळबळ जनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहेत. मला घबरविण्याचा प्रयत्न करु नका मी शेवटपर्यंत लढणार आहे. शाहरुख खानसह अनेकांना यात घाबरविण्यात येत असून, त्याच्याकडून पैसे मागण्यात येत आहे. त्यामुळे यात केंद्र सरकार कारवाई करणार नसेल, तर राज्याची SIT कारवाई करेल त्यामुळे तुम्ही घाबरु नका पुढे या आणि सांगा. असेही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

मलिक म्हणाले, सुनील पाटील यांचे नाव पुढे आणले जात आहे. मी सुनील पाटील यांना माझ्या आयुष्यात कधीच भेटलेलो नाही. त्यांचे गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री आदींसोबत फोटो आहेत. सुनील पाटील देखील फ्राॅड आहे. सुनील पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला विजय पगारे यांच्या संदर्भात माहिती दिली. मी त्यांना म्हणालो, तुम्ही मुंबईत या पोलिसांना सर्व माहिती द्या. त्यांनी सुरुवातीचा फोन धुळे येथून केला त्यानंतर त्यांना गुजरातमध्ये ठेवण्यात आले. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील नाहीत. सुनील पाटील हे समीर वानखडे यांचे प्राटव्हेट आर्मी प्लेअर आहे.

सॅम डिसूझा हा सॅनव्हिल डिसुझा आहे या प्रकरणात हा देखील आरोपी आहे. यावेळी मलिक यांनी सॅम डिसूझा आणि सिंग याची क्लीप दाखविली. त्याला अटक का केले नाही. सॅम डिसूझाने हवालेच्या माध्यमातून पैसे दिल्लीला पाठविले. नंबियार आणि राजकुमार बजाज हे फ्राॅड पत्रकार आहेत. ते समीर वानखडे यांच्यासाठीच काम करतात. त्यांचे कोणतेतरी युट्यूब चॅनल आहे. त्यामाध्यमातून ते अनेकांना त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळतात. याची माहिती चॅटच्या माध्यमातून समोर आली आहे. असाही आरोप मलिक यांनी यावेळी केला. एक पत्र देखील मला आले आहे. मला कोणत्याही पत्रकाराला बदनाम करायचे नाही. मी चूकीच्या लोकांविरोधात लढत आहे. मिट फ्री असे कोणतेच ऑपरेशन झाले नाही. 13 लोकांना पकडण्यात आले. 3 लोकांना सोडण्यात आले. आम्ही कोणत्याही पक्षाशी लढत नाही. NCB काही लोकांना सोबत घेऊन खंडणी वसुलीचा कार्यक्रम सुरु आहे. समीर वानखडे , सिंग, अशिष रंजन आणि माने त्याची चांडाळ चौकटी हे काम करत आहे. त्यांनी NCB चे नाव खराब केले आहे. असे गंभीर आरोप मलिक यांनी केले आहे. ललित हॉटेलमध्ये विजय पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते थांबले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT