Konkan Railway Summer Special Train Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्टीनिमित्त 'कोकण रेल्वे' मार्गावर धावणार मुंबई ते गोवा विशेष एसी ट्रेन

Konkan Railway Summer Special Train: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

Sameer Amunekar

सावंतवाडी: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. ही वाढती मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामात अतिरिक्त साप्ताहिक एसी गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) - करमळी - लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर साप्ताहिक विशेष गाड्या धावणार आहेत.

गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक (टी) ते करमळी एसी स्पेशल ही गाडी ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (टी) येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी १२ वाजता करमळी स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०५२ करमळी ते लोकमान्य टिळक (टी) एसी स्पेशल करमळी येथून परतीची गाडी १२ एप्रिल ते २४ मे २०२५ या कालावधीत दर शनिवारी दुपारी २:३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे ४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) पोहोचेल.

या विशेष गाडीमध्ये एकूण २० डबे असतील. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या प्रमुख स्थानकांवर गाडी थांबेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT