Amboli ghat crash Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amboli Accident: 12 लाखांच्या स्पोर्ट्स बाईकसह 70 हजारांच्या हेल्मेटचा चक्काचूर; कोल्हापुरातील उद्योजकाच्या मुलाचा आंबोलीत मृत्यू

Kolhapur bike accident: सिद्धेच्या डोक्यावर अत्याधुनिक ७० हजार रुपये किंमतीचे हेल्मेट होते मात्र, तरी देखील त्याचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

आंबोली : 'आवरा वेगाला, सावरा जिवाला', रस्त्यावर जागोजागी लावलेले फलक वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. याच वेगाचा मोह कोल्हापुरातील २३ वर्षीय तरुणाच्या अंगलट आला आहे. आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा या दरम्यान झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या १२ लाखांच्या स्पोर्ट्स बाईकसह ७० हजारांच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला आहे.

सिद्धेश विलास रेडेकर (२३, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धेश नामांकित बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा मुलगा होता तो कोल्हापुरात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. मित्रांसोबत आंबोलीकडे बाईकवरुन फिरण्यासाठी गेला असता रविवारी (२० एप्रिल) सकाळी अकरा वाजता त्याचा कारला धडकून अपघात झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, सिद्धेश बायकर होता, त्याला फिरण्याची आवड होती. रविवारी (२० एप्रिल) तो मित्रांसोबत आंबोलीकडे फिरण्यासाठी जात होता. त्याचवेळी त्याचा अपघात झाला. सिद्धेश एकुलता एक होता. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सिद्धेच्या डोक्यावर अत्याधुनिक ७० हजार रुपये किंमतीचे हेल्मेट होते मात्र, तरी देखील त्याचा मृत्यू झाला. याशिवाय त्याच्या १२ लाख रुपये किंमतीच्या स्पोर्ट्स बाईकचा देखील चक्काचूर झाला. दरम्यान, सिद्धेशच्या हेल्मेटला असलेल्या कॅमेऱ्यामुळे अपघाताची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पण, या अपघाताला सिद्धेशच्या बाईकचा वेगच कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT