Kolhapur Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur Accident: बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात; बस ड्रायव्हरचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी

Truck And Bus Crash: बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मंगळवारी (२२ एप्रिल) एका ट्रक आणि प्रवासी बसची धडक होऊन मोठा अपघात झाल्याचं समोर आलंय. या अपघातात बसच्या चालकाचा मृत्यू झाला

Sameer Amunekar

कोल्हापूर: बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मंगळवारी (२२ एप्रिल) एका ट्रक आणि प्रवासी बसची धडक होऊन मोठा अपघात झाल्याचं समोर आलंय. या अपघातात बसच्या चालकाचा मृत्यू झाला असून, बसमधील सुमारे १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या केबिनचेही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

घटनेनंतर काही मिनिटांतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT