Kirit Somaiya Dainik Gomantak
महाराष्ट्र

आयएनस निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

आयएनस निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

दैनिक गोमन्तक

आयएनस निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्यांनी 11 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली केली होती. सोमय्या आणि त्यांच्या मुलावर 2013-14 मध्ये आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेदरम्यान जमा झालेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणी सोमय्यांना मोठा झटका न्यायालयाने दिला आहे. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरुच

या प्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले होते की, तक्रारदाराने कोणताही पुरावा सादर केलेला नाही, तरीही मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माझ्याविरोधात एफआयआर नोंदवला. संजय राऊत यांनी याआधी 17 प्रकारचे आरोप केले आहेत. परंतु त्यांना एकही पुरावा न्यायालयात सादर करु शकले नव्हते.

आयएनएस विक्रांत प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT