Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कसबा- चिंचवड निवडणुकाचा निकाल जाहीर; भाजपच्या बालेकिल्यात कॉंग्रेसचा गुलाल

Maharashtra Politics: महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Politics: कसबा-चिंचवड पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यापासून ते मतदानापर्यंत मोठे वादही झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. आता कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे.

कसबा- चिंचवड पोटनिवडणूकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रचारात भाग घेतला होता. कसबा पोटनिवडणूकीत भाजपकडून हेमंत रासने आणि तर रविंद्र धंगेकर यांंना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती.

चिंचवड मध्ये भाजपकडून आश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे तर राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीसाठी उभे राहिले होते.

दरम्यान, आज कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून कसब्यात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. मतमोजणीच्या 20 फेऱ्या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेकर हे आघाडीवर होते.

रविंद्र धंगेकर हे 11,040 मतांनी विजयी झाले आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप या विजयाच्या जवळ असल्याचे दिसून येत आहे. समर्थक घोषणाबाजी करत आनंदाने जल्लोष करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT