Basavaraj Bommai & Jayant Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जयंत पाटलांनी घेतली भेट

गेल्या महिन्यामध्ये राज्यात आलेल्या महापूरादरम्यान, कर्नाटक (Karnataka) राज्याने केलेल्या सहकार्यबाबत आभार व्यक्त केले आहेत.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भेट घेतली आहे. आणि गेल्या महिन्यामध्ये राज्यात आलेल्या महापूरादरम्यान, कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्यबाबत आभार व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर दोन्ही राज्यातील धरणांच्या योग्य नियोजनामुळे खूप मोठ्या प्रमाणावर होणारी जीवीत आणि वित्त हानी टळली आहे. आगामी काळामध्ये दोन्ही शेजारी राज्ये योग्य समन्वय साधून आपला विकासमार्ग चालू ठेवतील असा विश्वास यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा देखील केली. येत्या 13 ते 20 ऑगस्टदरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या विषयावर देखील त्यांनी बैठकीमध्ये चर्चा केली.

शिवाय, 1 जुलै पासून माराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur), सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेल्या मुसळधार पावसामुळे 2019 पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग बहुतांश भाग या पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना याचा जबरदस्त फटका बसला असून घरासह व्यवसायाचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT