Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ठाकरे यांच इस्रायली दूतावासानं मराठीत ट्वीट करून केलं अभिनंदन

मुंबई महानगरपालिका (BMC) व आय. डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीस (I. D. E. Water Technologies) या इस्रायली (Israel) कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मुंबईच्या (Mumbai) समुद्रातील पाणी गोड करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबई महानगरपालिका (BMC) व आय. डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीस (I. D. E. Water Technologies) या इस्रायली (Israel) कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारानंतर इस्रायलच्या मुंबईतील दूतावासाने मराठीमध्ये ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरे यांचं अभिनंदन केलं. (Israeli embassy tweeted in Marathi thanking Chief Minister Uddhav Thackeray)

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 200दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा करार करण्यात आला. या आता त्यानुसार या प्रकल्पासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. या करारामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राजधानी मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतिकारी पाऊल आहे. जगात काही देशांनी यापूर्वीच समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची किंमत असते मात्र त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असताना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच बाबी विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, 2015 पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरू होईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पा संदर्भात एक ट्वीटही केलं होतं. याच ट्वीटला टॅग करत इस्रायली दूतावासाने मराठीतून ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे, असं इस्रायलनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे. ट्वीटमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT