Mumbai Ips  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी आयपीएस विवेक फणसळकर; आज पदभार स्विकारणार

अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कारकिर्दीला केली सुरुवात

दैनिक गोमन्तक

मुंबई : नुकताच राजीनामा देणारे शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या दिवशी राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामूळे महाराष्ट्रातील अनेक उच्चाधिकाऱ्यांना नव्या ठीकाणी आपला पदभार स्विकारावा लागणार आहे. यातच सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामूळे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी आयपीएस विवेक फणसळकर हे आपला पदभार स्विकारणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता ते पदभार स्विकारतील. (IPS vivek phalsankar new police commissioner of mumbai )

सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त होत आहेत. 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची बुधवारी उद्धव सरकारने मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. विवेक फणसळकर, 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे महासंचालक आणि एमडी म्हणून कार्यरत होते.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या जागी फणसळकर

विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या जागी विवेक फणसळकर येणार आहेत. राज्यात सध्या राजकीय पेचप्रसंग सुरू असताना फणसळकर हे पदभार स्वीकारणार आहेत. विवेक फणसळकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांत ठाणे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

विवेक फणसळकर हे ठाण्यातील 2008 च्या जातीय दंगली संपवण्याच्या भूमिकेसाठीही ओळखले जातात. फणसळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 1993 ते 1995 या काळात माजी राज्यपाल डॉ. पीसी अलेक्झांडर यांच्याकडे एडीसी म्हणून काम केले.

अकोला येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फणसळकर यांनी एसीबीचे अतिरिक्त संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांचा सिंचन घोटाळा प्रकरणासारख्या अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये तपास करण्यात आला आहे. मुंबईत फुणसाळकर यांनी सहपोलीस आयुक्त, वाहतूक तसेच पोलीस सहआयुक्त, प्रशासन म्हणून काम केले आहे. त्याला वाहतुकीचे चांगले ज्ञान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT